Site icon Aapli Baramati News

BIG NEWS : मुलगी झाली हो.. रणबीर-आलियाची गूड न्यूज..!

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

हिंदी चित्रपट सृष्टीतील बहुचर्चित जोडी असलेल्या रणबीर कपूर आणि आलिया भट्ट या दांपत्यांना कन्यारत्न झाले आहे. आलिया भट्ट हिने आज एका मुलीला जन्म दिला. कपूर-भट्ट कुटुंबीयांसह चाहत्यांनीही या बातमीनंतर आनंद व्यक्त केला आहे.

अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा एप्रिल महिन्यात विवाह झाला. त्यानंतर काही दिवसातच आलिया भट्ट हिनं आपण आई होणार असल्याची माहिती दिली होती. त्यामूळे या दोघांच्या चाहत्यांना नव्या पाहुण्याबद्दल उत्कंठा होती.

आलियाला आज सकाळी मुंबईतील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या रुग्णालयात तिने मुलीला जन्म दिला. आलियाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर संपूर्ण कपूर कुटुंबीय हजर होते. आलियाने दिलेल्या गूड न्यूजनंतर कुटुंबीयांसह चाहत्यांनी सोशल मिडीयावर आनंद व्यक्त केला.


आलिया भट्ट आणि रणबीरने १४ एप्रिल २०२२ रोजी लग्न बंधनात अडकले. यानंतर आलियानं काही महिन्यांपूर्वी एक फोटो शेअर करून ‘आमचं बाळ लवकरच येत असल्याची माहिती दिली होती. तर आलियाने बेबीबंप फोटशूट करून ही गुडन्यूज शेअर केली होती.आलिया आणि रणबीरची पहिली भेट ‘ब्रह्मास्त्र’ च्या सेटवर झाली होती. यानंतर दोघांनी एकमेकांना पाच वर्ष डेट केले आमि त्यानंतर लग्न केले होते.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version