Site icon Aapli Baramati News

रशिया आणि युक्रेनच्या युद्धाचा फटका; सूर्यफुल तेलाच्या दरात विक्रमी वाढ

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

कोरोना महामारीत महागाईच्या झळा बसल्याने केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या आयातीवरील शुल्क कपात केली होती. त्यामुळे डिसेंबर आणि जानेवारीमध्ये खाद्यतेलांच्या दरात कमालीची घसरण झाली होती.परंतु गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेनचे युद्ध सुरू आहे. त्याचाच फटका भारतीयांना बसला आहे.या युद्धामुळे सूर्यफूल तेलाच्या दरात कमालीची वाढ झालेली दिसत आहे. 

गेल्या १५ दिवसात सूर्यफूल तेलाचे दर प्रतिलिटर मागे तब्बल ४५ रुपयांनी वाढले आहेत. केवल एका महिन्यातच तेलाच्या दरात वाढ झाली असून १२५ रुपयांवरून १७० ते १८० रुपयांकडे तेलाचे दर पोहोचले आहेत. त्यामुळे या युद्धामुळे पुन्हा एकदा सर्वसामान्यांचे महिनाभराची बजेट कोलमडल्याचे आपल्याला दिसून येत आहे.

भारत देशात एकूण खाद्यतेलांपैकी ८० टक्के खाद्यतेल हे आयात केले जाते. त्यापैकी सगळ्यात जास्त आयात ही युक्रेन या देशांमधून केली जाते. परंतु रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमधून होणारी आयात बंद झाली आहे. त्यामुळे शहरात खाद्यतेलांचा प्रामुख्याने सूर्यफुलाच्या तेलात मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. 


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version