नवी दिल्ली : वृत्तसंस्था
एकीकडे रशिया आणि युक्रेन यांचे युद्ध सुरू आहे तर दुसरीकडे या युद्धाचा परिणाम भारत देशाला भोगावा लागत आहे. या युद्धाचा फटका मोठ्या प्रमाणात एफएमजीसी कंपन्यांना बसला असून गहू, खाद्यतेल आणि कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अशातच महागाईत १० ते १५ टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मागील काही काळात गहू, खाद्यतेल, कच्च्या तेल्यांच्या किमती वाढल्यामुळे महागाईत १० ते १५ टक्के वाढ होण्याची शक्यता अर्थतज्ञांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे अगोदरच महागाईने होरपळलेल्या नागरिकांना काही दिवसांमध्ये दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तूंसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
रशिया आणि युक्रेन युद्धाचा मोठ्या प्रमाणात फटका भारताला बसल्याचे दिसत आहे. त्यातच आता आणखी महागाई वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. देशात खाद्यतेल, कच्च्या तेलासह अन्नधान्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांचे दैनंदिन बजेट कोलमडले आहे. त्यातच आता आणखी महागाई वाढण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने सामान्य नागरिकांचे दैनंदिन खर्चाचे गणित बिघडणार आहे.
हिंदुस्थान युनिलिव्हरनेही आपल्या उत्पादनाच्या किंमती वाढवल्या आहेत. साबण, चहा आणि कॉफी अशा प्रत्येक वस्तूंच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांची वाढ केली आहे. याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. दरम्यान कच्च्या तेलाचे मालाचे दर वाढले आहेत त्यामुळे कंपनीनेदेखील दरवाढ करण्याचा निर्णय घेतला असल्याचे कंपनी प्रशासनाने सांगितले आहे.