नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मागील काही काळात इंधनाच्या दरात मोठी वाढ झाली. त्यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आलेली असतानाच केंद्र सरकारकडून दिलासा देणारी बातमी पुढे आली आहे. ऐन दिवाळीत केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेलवर लावला जाणारा अबकारी कर कमी केल्यामुळे पेट्रोल ५ रुपयांनी, तर डिझेल १० रुपयांनी स्वस्त होणार आहे.
ऐन दिवाळीत केंद्र सरकारने सामान्य नागरिकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये पेट्रोल-डिझेलवर लावला जाणारा अबकारी कर कमी करण्यात आला आहे. त्यामुळे आज मध्यरात्रीपासून पेट्रोल ५ रुपयांनी आणि डिझेल १० रुपयांनी स्वस्त होणार आहे.
पेट्रोलच्या तुलनेत डिझेलवरील कर दुपटीने कमी करण्यात आला आहे. त्यामुळे डिझेलवर अवलंबून असणाऱ्या वाहनांसह शेतकरी वर्गाला या निर्णयाचा फायदा होणार आहे. ऐन दिवाळीत केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळणार आहे.