Site icon Aapli Baramati News

Big News : Paytm ना करो…! पेटीएमला आरबीआयचा मोठा धक्का

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

एकीकडे पेटीएमची शेअर बाजारात घसरण होत असताना दुसरीकडे या कंपनीला आरबीआय ने मोठा धक्का दिला आहे. या बँकेला नविन ग्राहक जोडण्यासाठी बंदी घातली आहे. त्याचबरोबर पेमेंट बँकेचे आयटी ऑडिट करण्याचे आदेश आरबीआयने शुक्रवारी दिले आहेत.

आरबीआयने ही कारवाई बँकेत आढळून आलेल्या देखरेख आणि पर्यवेक्षणविषयी त्रुटीवरून केली आहे. आरबीआयने या पेटीएम पेमेंट बँकेला तातडीने बँकिंग नियमन कायदा १९४८ कलम ३५ अ अंतर्गत नवीन ग्राहक जोडण्यास थांबवण्याचे आदेश एका परिपत्रकाद्वारे दिले आहेत.

पेटीएम ही देशातील सगळ्यात मोठी आयपीओ असलेली एक बँक आहे. परंतु या बँकेत गुंतवणूक केल्यामुळे गुंतवणूकदारांचे खूप नुकसान झाले होते. त्यामुळे आरबीआयने ही कारवाई केली आहे. विशेष म्हणजे पेटीएमच्या आर्थिक व्यवहारात मोठ्या प्रमाणात त्रूटीही आढळल्या आहेत. 

मागील काही काळात आरबीआयने खाजगी क्षेत्रातील बँकांवर कारवाई करण्याचा सपाटाच लावला आहे. त्यात सध्या पेटीएम बॅंक रडारवर आली आहे. 


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version