Site icon Aapli Baramati News

Big Breaking : आयकर विभागाचे २६ ठिकाणी छापे; अनिल परब यांच्या अडचणीत वाढ

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित २६ ठिकाणी आज आयकर विभागाने टाकले आहेत. त्यामुळे परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सध्या दापोली येथील जमीन व्यवहार प्रकरणी आयकर विभागाकडून ही कारवाई सुरू असून मुंबई, पुणे, रत्नागिरी आणि सांगली या ठिकाणी आयकर विभागाने छापे टाकले आहेत.

अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम आता आयकर विभागाच्या रडारवर असल्याचे दिसून येत आहे.तसेच काही शासकीय अधिकाऱ्यांच्या घरांवर आयकर विभागाने छापे टाकले आहे. दापोलीतील जमीन खरेदी प्रकरणात आयकर विभागाकडून ही कारवाई सुरू आहे.

गेल्या दहा वर्षात परब यांच्या निकटवर्तीयांनी पुणे, सांगली आणि बारामतीसह अनेक ठिकाणी संपत्ती जमवली आहे. त्याचबरोबर गेल्या सात वर्षांत १०० एकरहून अधिक शेतजमीन खरेदी केली आहे, अशी माहिती प्राप्तिकर विभागाने दिली आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version