Site icon Aapli Baramati News

मोठी बातमी : देशातील सर्वच क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंज ‘जीएसटी’ महासंचालनालयाच्या रडारवर

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

देशातील क्रिप्टोकरन्सीबाबत मोठा खुलासा झाला आहे. सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंज म्हणून ओळखल्या जाणार्‍या वझीरएक्स क्रिप्टोकरन्सीवर जीएसटी गुप्तचर विभागाने छापा टाकला. त्यामध्ये करोडोंची करचोरी उघडकीस आली आहे. त्यामुळे आता आता वझीरएक्स बरोबरच इतर एजन्सीदेखील जीएसटी महासंचालनालयाच्या रडारवर आहेत

या संदर्भात संचालनालयाकडून कोणतीही माहिती शेअर करण्यात आलेली नसली तरी मीडिया रिपोर्ट्सनुसार ही कारवाई सुरू झाली आहे.  मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, वझीरएक्सच्या एक्सचेंजमध्ये करचुकवेगिरीचे प्रकरण जीएसटी महासंचालनालयाच्या कारवाईत पकडले गेले आहे. त्याचप्रमाणे इतर क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजमध्येही मोठ्या प्रमाणावर करचोरी होत असल्याचा संशय आहे. त्यामुळेच जीएसटी इंटेलिजन्सचे अधिकारी चोरी कुठे होत आहे हे शोधण्यासाठी क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारात प्रमुख भूमिका बजावणाऱ्या अनेक क्रिप्टो एक्सचेंजेसवर शोध मोहीम राबवत आहेत.

मुंबई पूर्व आयुक्तालयाच्या माहितीनुसार देशातील सर्वात मोठे क्रिप्टो एक्सचेंज वझीरएक्स जे क्रिप्टोकरन्सीमध्ये व्यवहार करते. त्यांच्याकडून दीर्घ काळापासून जीएसटी भरणे टाळले आहे. हा आकडा सुमारे ४०.५ कोटी रुपयापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे या कोट्यवधींची करचोरी उघड करणाऱ्या अधिकाऱ्यांनी एक्स्चेंजवर व्याज आणि दंड आकारून आता तब्बल ४९ कोटींहून अधिकचा दंड वसूल केला आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version