Site icon Aapli Baramati News

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नक्षलवादी भागाच्या विकासासाठी १२०० कोटींची मागणी

ह्याचा प्रसार करा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी नक्षलवादाच्या मुद्द्यावर बोलावलेल्या  बैठकीसाठी ठाकरे दिल्लीला गेले आहेत .त्यांनी बैठकीस हजर राहून महाराष्ट्रातील नक्षलवादी भागाचा विकास करण्यासाठी १२०० कोटी रुपयांची मागणी केली असल्याचे सुत्रांची माहिती आहे. ज्या राज्यांत नक्षलवादी भाग आहे. त्या राज्यांना या बैठकीत आमंत्रित करण्यात आले होते .

केंद्र सरकारने देशातील नक्षलवादी आणि माओवादी नक्षलवाद कमी करण्यासाठी आणि तत्सम उपयोजना करण्यासाठी व त्यासोबतच काही दिवसापूर्वी मोठ्या शहरांमध्ये नक्षलवादाला सुरुवात होणार असल्याचे गुप्तचर यंत्रणेने माहिती दिली आहे.  अशा अनेक पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. उद्धव ठाकरे या बैठकीत उपस्थित राहिले होते.   नक्षलवाद कमी व्हावा. यासाठी त्यांनी  राज्यातील नक्षलवादी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी १२०० कोटी रुपयांची मागणी केली आहे.

कायम ज्या राज्यांना नक्षलवादाला सामोरे जावा लागते;  अशा सर्व राज्यांना आजच्या बैठकीत आमंत्रित करण्यात आले होते. या बैठकीत महाराष्ट्र, ओडिसा, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, केरळ, बिहार, झारखंड या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह अधिकाऱ्यांनी सहभाग घेत आपल्या मागण्या मांडल्या.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version