Site icon Aapli Baramati News

महिलांनी अधिक समृद्ध होवून स्वत:ला सिद्ध करण्याची गरज : सुनेत्रा पवार

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

आज सर्वच क्षेत्रात महिलांनी आपला नावलौकीक मिळवला आहे. पुरुषांच्या बरोबरीने महिला काम करताना दिसतात ही अभिमानास्पद बाब आहे. मात्र सध्याच्या युगात महिलांनी अधिक समृद्ध होत स्वत:ला सिद्ध करून दाखवलं पाहिजे असे मत बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केले.

बारामती तालुक्यातील पिंपळी ग्रामपंचायतीच्या वतीने व सावित्री महिला प्रशिक्षण संस्थेच्या सहकार्यातून महिला व युवतींसाठी व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात आले. यातील प्रशिक्षणार्थी महिला व युवतींना सुनेत्रा पवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. या प्रशिक्षण शिबिरात  १२७ महिलांनी सहभाग नोंदवला.

पिंपळी-लिमटेक ग्रामपंचायतीने आयोजित केलेले शिबिर व्यावसायिकदृष्ट्या गरजेचा असून गरजू महिलांनी असे व्यावसायिक शिक्षण घेऊन स्वावलंबी होण्याची आवश्यकता आहे. प्रशिक्षित झालेल्या गरजू महिलांना बारामतीतीळ टेक्स्टाईल पार्कमध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाईल, अशी ग्वाही सुनेत्रा पवार यांनी यावेळी दिली. सावित्री महिला प्रशिक्षण संस्थेच्या अध्यक्षा स्नेहा थोरात व उपाध्यक्ष पुनम थोरात यांचे त्यांनी विशेष कौतुक केले.

प्रशिक्षण घेतलेल्या सर्व महिलांनी पंचायत समिती व जिल्हा परिषदच्या माध्यमातून वैयक्तिक लाभाच्या योजनेतून शिलाई मशीन मिळवण्यासाठी सहकार्य करण्यात येईल असे गटविकास अधिकारी अनिल बागले यांनी यावेळी सांगितले. टेलरिंग प्रशिक्षण कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ग्राममपंचायतीच्या सदस्या अश्‍विनी बनसोडे यांनी विशेष प्रयत्न केले.

उपस्थित मान्यवरांचे स्वागत सरपंच मंगल केसकर यांनी केले. प्रास्ताविक संतोष ढवाण यांनी केले. तर सूत्रसंचालन बाळासाहेब बनसोडे यांनी व आभार उपसरपंच आबासाहेब देवकाते यांनी मानले.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version