बारामती : प्रतिनिधी
बारामती शहरात आज तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शिवजयंती उत्सव समितीच्या माध्यमातून
मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यामुळे यावेळी शिवजयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी होत आहे.
बारामती शहरातील कसबा येथील छत्रपती शिवाजी उद्यानामध्ये मान्यवरांच्या हस्ते शिवपूजन करण्यात आले. माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पोलिस निरीक्षक सुनील महाडीक, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुनील शिंदे, बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, उपमुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव हनुमंत पाटील, मुख्याधिकारी महेश रोकडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, मनसेचे सुधीर पाटसकर, सौ. कल्पना जाधव, दिलीप ढवाण, अमर धुमाळ, देवेंद्र शिर्के, प्रदीप शिंदे, दिलीप शिंदे, सूरज सातव, दीपक मालगुंडे, छगन आटोळे, संजय किर्वे, अँड. जी. बी. गावडे, सुनील कदम, संजय किर्वे, सुनिल सातव, उमेश दुबे, बबन पारख, जितेंद्र जाधव, संभाजी माने,जब्बार पठाण, राकेश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
येथील छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी शिवप्रेमींनी गर्दी केली होती. सायंकाळी शहरातून शिवप्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत उंट, घोडे, पारंपारिक नृत्य पथके, ढोल-ताशा पथकांचा समावेश असणार आहे.