Site icon Aapli Baramati News

बाबुर्डी सोसायटीच्या अध्यक्षपदी शांताराम ढोपरे; उपाध्यक्षपदी उत्तम लडकत

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

बाबुर्डी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी शांताराम लक्ष्मण ढोपरे यांची, तर उपाध्यक्षपदी उत्तम आबूराव लडकत यांची एकमताने निवड करण्यात आली. या संस्थेची पंचवार्षिक निवडणुक बिनविरोध झाली होती. 

ही निवडणूक बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब पोमणे, सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब पांडूरंग लडकत, हौसेराव पोमणे, साहेबराव पोमणे, राजकुमार लव्हे यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध करण्यात आली होती. बाबुर्डी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था ही सुपे परिसरातील एक नामांकीत संस्था असून आजपर्यंत या संस्थेची स्थापना झाल्यापासून कधीच निवडणूक झाली नसून ही संस्था सर्वांना विश्वासात घेऊन वाटचाल करत आहे. 

अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची बिनविरोध निवड पार पाडण्यासाठी सरपंच ज्ञानेश्वर पोमणे, उपसरपंच ॲड.  दिपाली जगताप, पोलिस पाटील वनिता लव्हे, दत्तात्रय ढोपरे तसेच सर्व संचालक, सभासद यांचे मोलाचे सहकार्य लाभले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मिलिंद टांकसाळे, सचिव संजय झगडे, सहसचिव प्रमोद देव यांनी काम पाहिले.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version