बारामती : प्रतिनिधी
पिंपळी-लिमटेक ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आबासाहेब देवकाते यांची निवड करण्यात आली. राहुल बनकर यांनी कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे राजीनामा दिला होता. त्यांच्या जागी देवकाते यांची निवड करण्यात आली.
पिंपळी लिमटेक ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडी पॅनलचे वर्चस्व आहे. या पॅनलकडून राहुल बनकर यांना उपसरपंचपदाची संधी देण्यात आली होती. कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर बनकर यांनी राजीनामा दिला. त्यानुसार रिक्त जागी आबासाहेब देवकाते यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब भोईटे यांनी काम पाहिले.
यावेळी प्राजक्ता श्रीनिवास देवकाते पाटील यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी संतोष ढवाण, सरपंच मंगल केसकर, माजी उपसरपंच राहुल बनकर, रमेशराव ढवाण, भाऊसाहेब भिसे, ॲड.सचिन वाघ, सुनिल बनसोडे, पोलीस पाटील मोहन बनकर, अशोकराव ढवाण यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.