बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथील समर्थ ज्ञानपीठाचे संस्थापक स्व. हनुमंतराव सावंत आणि ज्येष्ठ पत्रकार दत्ता सावंत यांच्या भगिनी नंदा बाळासाहेब वरे यांचे वयाच्या ४८ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.
माहेर वाघळवाडी आणि सासर मळद असलेल्या नंदा वरे या मागील काही दिवसांपासून आजाराने त्रस्त होत्या. त्यांच्यावर सध्या बारामती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. आज पहाटे त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले.
बारामती शहरानजीक असलेल्या मळद येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने वरे व सावंत परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. नंदा वरे यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, जावई, दिर, भाऊ, भावजय असा परिवार आहे.
सावडण्याचा विधी मंगळवारी : मंगळवार दि. १९ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता मळद, ता. बारामती येथे सावडण्याचा विधी होणार आहे.