Site icon Aapli Baramati News

Baramati Breaking : माळेगाव कारखान्याचे रेकॉर्डब्रेक गाळप; ६५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच १५ लाख टन उसाचे गाळप

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

माळेगाव सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात तब्बल १५ लाख टन उसाचे विक्रमी गाळप पूर्ण केले आहे. कारखान्याच्या आजपर्यंतच्या ६५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात विक्रमी गाळप झाले आहे.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रासह परिसरात यावर्षी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड झाली आहे. त्यामुळे यावर्षी ऊस मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला आहे. कारखान्याने सभासद आणि गेटकेन असा मेळ घालत आतापर्यंत तब्बल १५ लाख टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. कारखान्याच्या आतापर्यंतच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात गाळप करण्यात आले आहे.

यावर्षी मोठ्या प्रमाणात ऊस उपलब्ध असून सभासदांच्या सर्व उसाचे गाळप करण्याच्या अनुषंगाने नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार शिल्लक उसाचे गाळप पूर्ण झाल्यानंतरच हंगामाची सांगता होणार असल्याचे कारखाना व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version