बारामती : प्रतिनिधी
राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर अजित पवार हे शनिवारी प्रथमच बारामती दौऱ्यावर येत आहेत. अजितदादा सकाळी विकासकामांची पाहणी करणार आहेत. त्यानंतर विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलात नागरीकांच्या भेटी घेणार आहेत.
विधानपरिषद निवडणुकीनंतर शिवसेना आमदारांनी बंड केले. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी पदभार घेतला. या दरम्यान, विरोधी पक्षनेते पदावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड झाली. त्यानंतर प्रथमच अजितदादा बारामतीत येत आहेत.
शनिवारी सकाळी ६ ते ८ या वेळेत अजितदादा शहरातील विकासकामांची पाहणी करणार आहेत. त्यानंतर ते विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलात नागरीकांच्या भेटीगाठी घेणार आहेत.