Site icon Aapli Baramati News

कुरकुंभ येथील केमिकल चोरणाऱ्या टोळीवर पोलिसांनी केली कारवाई

ह्याचा प्रसार करा

कुरकुंभ : प्रतिनिधी

काही दिवसांपूर्वी कुरकुंभ येथील मेलजर केमिकल या कंपनीतून ५७ बॅरल केमिकल चोरीला गेले होते. या केमिकलची किंमत तब्बल ४८ लाख ५० हजार रुपये इतकी आहे. या प्रकरणातील दहा जणांच्या टोळीला दौंड पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडील तब्बल १३ लाख ६५ हजार ७२९ रुपयांचे नायट्रो मिथेन केमिकल जप्त केले आहे.

बिराप्पा मारुती लवटे (रा. गोपाळवाडी,ता. दौंड), केशव दत्तू रसाळ (रा. पाटस, ता. दौंड), डब्बू बघेला कहार (रा. उत्तर प्रदेश), विशाल दशरथ शितोळे (रा. खडकी ता. दौंड), सागर मच्छिंद्र बारवकर (रा. देऊळगावगाडा, ता. दौंड), सचिन संजय गिरमे (रा. कुरकुंभ, ता. दौंड), महेश तात्यासाहेब गायकवाड (रा. कुरकुंभ, ता. दौंड), संजय टिटलू यादव (रा. भिवंडी, मुंबई) , राम लवटन यादव (रा. भिवंडी, मुंबई) आणि शंकर दिनकर झरेकर (रा. नानविज, ता. दौंड) या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे.

चोरीमध्ये खाजगी सुरक्षारक्षकासह इतर कामगारांचा समावेश असल्याचे तपासात समोर आले आहे. लाखो रुपयांचे केमिकल चोरीच्या तपासासाठी ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते आणि उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी स्थानिक पोलिसांची पथके तयार केली.

या पथकांनी राज्यासह अनेक जिल्ह्यात तपास केला. या तपासादरम्यान दहा जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याचबरोबर या प्रकरणाचा अधिक तपास दौंड पोलीस करत आहेत.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version