Site icon Aapli Baramati News

तलवार आणि कोयत्यांसह माळेगाव येथून एकाला अटक

ह्याचा प्रसार करा
Facebook
Twitter
Linkedin
Whatsapp
Instagram
Email
Telegram

बारामती : प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रूक येथून एक जणाला पोलिसांनी १ तलवार आणि २ कोयत्यांसह अटक केली आहे. तेजस खंडाळे (रा. माळेगाव, ता. बारामती) याला माळेगाव पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांना अगोदरच याबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर माळेगाव बुद्रुक येथील शिवनगर येथे पोलीस गस्त घालत होते. त्यावेळी झेलसिंग रोड येथे तेजस तीन ते चार तलवारी घेऊन थांबला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे यांना खबऱ्याकडून मिळाली होती.

या माहितीवरून पोलिसांनी या परिसरात सापळा रचला. त्यावेळी तेजस हा संशयास्पद पद्धतीने हालचाली करत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे १ तलवार आणि २ कोयते सापडले. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्यामार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे, पोलीस नाईक राजेंद्र काळे, दत्तात्रय चांदणे, पोलीस शिपाई संतोष मखरे, होमगार्ड सकट, किशोर भंडलकर यांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणाचा अधिक माळेगाव तपास पोलिस करीत आहेत.


ह्याचा प्रसार करा
FacebookTwitterLinkedinWhatsappInstagramEmailTelegram
Exit mobile version