Site icon Aapli Baramati News

LIVE : बारामतीच्या साहित्य कट्ट्यावर आज ‘चेकमेट’चे लेखक सुधीर सूर्यवंशी यांच्याशी होणार मनमोकळ्या गप्पा

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

बारामतीतील साहित्य रसिकांनी एकत्र येत सुरू केलेल्या ‘बारामतीचा साहित्यकट्टा’ या उपक्रमात आज ‘चेकमेट’ या पुस्तकाचे लेखक, राजकीय विश्लेषक सुधीर सूर्यवंशी सहभाग घेणार आहेत. आज शनिवारी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत हा गप्पांचा कार्यक्रम होणार आहे.

बारामतीत मागील काही वर्षांपासून साहित्य कट्टा सुरू करण्यात आला आहे. यामध्ये आजपर्यंत अनेक नामवंत साहित्यिकांनी सहभाग घेतला आहे. साहित्यिकांशी मनमोकळ्या गप्पा मारतानाच त्यांचा जीवन प्रवास, साहित्य क्षेत्रातील अनुभव जाणून घेता यावेत या उद्देशाने हा उपक्रम प्रत्येक महिन्यातील चौथ्या शनिवारी राबवला जात आहे.

आतापर्यंत अनेक प्रसिद्ध साहित्यिक या उपक्रमात सहभागी झाले आहेत. आज होणाऱ्या या उपक्रमात लेखक सुधीर सूर्यवंशी हे सहभाग घेणार आहेत. चेकमेट या पुस्तकात गेल्या दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात रंगलेल्या राजकारणामागील अनेक घडामोडी सुधीर सूर्यवंशी यांनी चेकमेट या पुस्तकातून पुढे आणल्या आहेत.

https://www.facebook.com/aaplibaramatinews/

आज सायंकाळी ५ ते ७ या वेळेत बारामती एमआयडीसीतील हॉटेल सिटी इन येथे हा कार्यक्रम होणार आहे. आपली बारामती न्यूजच्या फेसबुक पेजवरून या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. या कार्यक्रमाचा अधिकाधिक श्रोत्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.   


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version