Site icon Aapli Baramati News

Baramati Breaking : विरोधी पक्षनेते अजितदादा बारामती दौऱ्यावर; विद्या प्रतिष्ठानमध्ये जनता दरबार आणि बारामतीसह सायंबाचीवाडी, मोरगाव येथे विकासकामांचे उदघाटन..!

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी    

विरोधी पक्षनेते अजित पवार हे उद्या बारामती दौऱ्यावर येत आहेत. सकाळी ६ वाजल्यापासून अजितदादांच्या दौऱ्याला सुरुवात होणार असून बारामती, सायंबाचीवाडी आणि मोरगाव येथील विविध कार्यक्रमांना अजितदादा हजेरी लावणार आहेत. दरम्यान, सकाळी ८ ते १० या वेळेत विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलात जनता दरबार होणार असून अजितदादा नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहेत.

विरोधी पक्षनेते अजित पवार हे शुक्रवारी सकाळी ६ ते  ८ या वेळेत बारामतीतील विविध विकासकामांची पाहणी करणार आहेत. तर सकाळी ८ वाजता विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलात माळेगाव नगरपंचायतीच्या सीएनजी व इलेक्ट्रिक घंटागाड्यांचे लोकार्पण होणार आहे. तसेच ईसीजी मशीनचेही लोकार्पण अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.

त्यानंतर १० वाजेपर्यंत जनता दरबार होणार असून सकाळी १० वाजता सिनेमा रोडवरील अॅंथेस्टिक व अॅडव्हान्स होमिओपॅथीक क्लिनिकचे उदघाटन, १०-३० वाजता इंदापूर रस्त्यावरील डॉ. गायकवाड स्पेशलीटी डायग्नोस्टिक सेंटरचे  उदघाटन होणार आहे. सकाळी ११ वाजता मोरगाव रस्त्यावरील एकता इंग्लिश मिडियम स्कूलचे उदघाटन होईल.

सकाळी १२.३० वाजता सायंबाचीवाडी येथील विविध विकासकामांचे लोकार्पण आणि एक तास राष्ट्रवादीसाठी उपक्रमांतर्गत कार्यकर्ता मेळावा होणार आहे. दुपारी ३ वाजता मोरगाव येथील विविध विकासकामांचे भूमीपूजन व उदघाटन, मोरया सीएनजी पंपचे उदघाटन अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version