Site icon Aapli Baramati News

BARAMATI : बारामतीतील बांधकाम व्यावसायिकांचा मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा; सक्रिय सहभाग घेणार..!

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी संघर्ष सुरु केला आहे. याला पाठिंबा म्हणून बारामतीत सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला आता बारामतीतील बांधकाम व्यावसायिकांनीही पाठिंबा दिला असून यापुढील काळात सक्रिय सहभाग घेणार असल्याचं पत्र देण्यात आलं आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी निकराची लढाई सुरु केली आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात त्यांनी अन्नत्याग केला आहे. त्यांच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत असून बारामतीतही सकल मराठा समाज या आंदोलनात सहभागी झाला आहे. बारामतीतील प्रशासकीय भवनासमोर साखळी अन्नत्याग आंदोलन सुरु करण्यात आलं आहे.

या आंदोलनात विविध गावातील मराठा बांधव सहभाग घेत आहेत. आज बारामतीतील बांधकाम व्यावसायिकांनी एकत्र येत या आंदोलनाला पाठिंबा जाहिर केला. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली निघावा यासाठी आवश्यक ती मदत करण्याबरोबरच या आंदोलनात सक्रिय सहभाग घेणार असल्याचे बांधकाम व्यावसायिकांच्या वतीने दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version