Site icon Aapli Baramati News

राष्ट्रवादीचे माजी सरपंच जयदीप तावरे यांना जामीन मंजूर

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

माळेगाव येथील राष्ट्रवादीचे माजी सरपंच जयदीप दिलीप तावरे यांना जामीन मंजूर झाला आहे. पुण्यातील मोक्का न्यायालयाने जयदीप तावरे यांना जामीन मंजूर केला आहे.

माळेगावच्या रविराज तावरे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी जयदीप तावरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. आज याबाबत मोक्का न्यायालयात सुनावणी झाली. ॲड. सचिन वाघ यांनी जयदीप तावरे यांच्या वतीने बाजू मांडली. जयदीप तावरे यांच्यासंदर्भात पोलिसांकडून देण्यात आलेला अहवाल न्यायालयाने फेटाळला असला तरी त्यांच्यावर मोक्काअंतर्गत झालेली कारवाई चुकीच्या पद्धतीची असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला.

या संदर्भात उच्च न्यायालयाचे दाखले देत त्यांनी जयदीप तावरे यांना जामीन देण्याची मागणी केली. त्यानुसार मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश अग्रवाल यांनी जयदीप तावरे यांना जामीन मंजूर केला आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version