Site icon Aapli Baramati News

सुपे परिसरात सोमेश्वरकडून साखर वाटप; मुदत वाढवण्याची शेतकऱ्यांची मागणी

ह्याचा प्रसार करा

सुपे : प्रतिनिधी

सोमेश्वर सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रात येणाऱ्या सुपे व परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी वर्गासाठी सुपे येथे मध्यवर्ती ठिकाण म्हणुन साखर वाटप केंद्र देण्यात आले आहे. दिपावली निमित्त या वाटप केंद्रात गर्दीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे साखर वाटपाची मुदत आणखी दोन दिवस वाढवावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. 

सोमेश्वर कारखाना परिसरातून साखर आणण्यासाठी वेळ आणि पैसा वाया घालवावा लागतो. त्यामुळे कारखान्याकडून सवलत दरात मिळणारी साखर नियमीत दरातच पडते. ज्यांचा ऊस कमी आहे, त्यांना ही साखर सोमेश्वर कारखान्यावर जाऊन आणणे परवडणारे नाही. 

या पार्श्वभूमीवर कारखान्याने सण उत्सव काळात किमान चार दिवस साखर वाटप सुरू ठेवावे अशी मागणी माजी संचालक गणेश चांदगुडे यांनी केली आहे. सध्या दिवाळीमुळे साखर वाटप केंद्रावर मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे या केंद्राची मुदतही वाढवावी अशीही मागणी होत आहे. 


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version