आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पुणेबारामतीमहानगरेमहाराष्ट्र

Crime News : दिवसा घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला बारामती पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणे
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

बारामती शहरात भरदिवसा बंद घरांवर नजर ठेवून घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला बारामती पोलीसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून गुन्हे प्रकटीकरण शाखेने ७ लाख २० हजार रुपये किमतीचे सुमारे १८ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

लोकेश रावसाहेब सुतार (वय २८ वर्षे, रा.लिंगनूर, ता. मिरज, जि. सांगली) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्याकडे पोलीसांनी अधिक तपास केला असता त्याने संदीप यशवंत पाटील (रा. लिंगनूर) या साथीदारांच्या मदतीने घरफोडी करत असल्याची कबुली दिली.

बारामती शहरांमध्ये दिवसेंदिवस बंद घरांवर नजर ठेवून लुटण्याचे प्रमाण वाढतच चालले होते.याच पार्श्‍वभूमीवर पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते आणि उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी या गुन्ह्याचा तपास करण्याच्या सूचना पोलीस पथकाला दिल्या होत्या. 

त्यानुसार पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश वाघमारे, उपनिरीक्षक सागर ढाकणे, अंमलदार अभिजीत कांबळे, संजय जगदाळे, कल्याण खांडेकर, संजय जाधव, दशरथ कोळेकर, रामचंद्र शिंदे, बंडू कोठे, अंकुश दळवी, तुषार चव्हाण, रणजित देवकर, अजित राऊत, दशरथ इंगोले हे पथक तपास करत होते.

या पथकाला तपास करत असताना शेजारील  जिल्ह्यातील लोकेश सुतार हा कळंबा कारागृहातील आरोपी याच प्रकारचे गुन्हे करत असल्याचे आढळून आले. सध्या तो कोल्हापूरमध्ये न्यायालयीन कोठडीत होता. पोलीसांनी त्याला ताबा वॉरंटच्या आधारे ताब्यात घेतले असून त्याच्याकडे तपास केला असता त्याने साथीदाराच्या मदतीने बारामती शहरात भरदिवसा घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे.


ह्याचा प्रसार करा
पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us