Site icon Aapli Baramati News

Crime News : बारामती शहरातील लॉजवर वेश्या व्यवसाय; महिला एजंटवर शहर पोलिसांची कारवाई

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी  

बारामती शहरातील चिमनशहामळा परिसरातील एका लॉजवर सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी रुई परिसरातील बयाजीनगर येथे राहणाऱ्या दलाल महिलेला अटक करण्यात आली आहे. या महिलेच्या ताब्यातून एका २२ वर्षीय महिलेची मुक्तता करण्यात आली आहे.

बारामती शहरातील सिल्वर जुबली रुग्णालयासमोर चिमणशहामळा येथील सुविधा लॉजजवळ एक महिला पैसे घेऊन मुली पुरवण्याचा धंदा करत असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी बारामती शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमारे, पोलीस कर्मचारी अमृता भोईटे, अजित राऊत, मनोज पवार, लता हिंगणे, राहुल लाळगे यांना कारवाईच्या सूचना दिल्या.

बारामती शहर पोलिसांनी एक बनावट ग्राहक या महिलेकडे पाठवला.  संबंधित महिलेने दीड हजार रुपये घेऊन या बनावट ग्राहकाला महिला पुरवण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार संबंधित महिलेला बारामती शहरातील लॉजवर पाठवण्यात आले. या दरम्यान पोलिसांनी छापा मारत संबंधित महिलेला ताब्यात घेतले. या छाप्यात २२ वर्षीय पीडित महिलाही मिळून आली.

या एजंट महिलेवर अनैतिक मानवी व्यापार अधिनियम  १९५६ कलम ३४५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे. पिडीत महिलेची सुटका करत तिला वसतिगृहात पाठवण्यात आले आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version