Site icon Aapli Baramati News

Crime Breaking : बारामतीत महावितरण अभियंत्याची गळफास घेऊन आत्महत्या..!

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

बारामतीत महावितरणमध्ये कार्यरत असलेल्या सहाय्यक अभियंत्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अभियंत्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मनीष माधवराव दंडवते (वय ४३) असे या आत्महत्या केलेल्या अभियंत्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मनीष दंडवते हे बारामतीत महावितरणचे सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत होते. ऊर्जा भवन परिसरात असलेल्या कर्मचारी वसाहतीमध्ये ते वास्तव्यास होते. गेल्या दोन दिवसांपासून ते कामावर आले नव्हते. आज त्यांचा डबेवाला नेहमीप्रमाणे डबा देण्यासाठी गेला. मात्र त्यांनी दरवाजा उघडला नाही.

दरवाजा उघडत नसल्याने या डबेवाल्याने त्यांच्या घराच्या खिडकीतून डोकावले. त्यावेळी त्यांनी घरात नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. बारामती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील महाडीक, सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश पाटील यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. दंडवते यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

दंडवते हे एकटेच बारामतीत वास्तव्यास होते. त्यांचे कुटुंबीय सोलापूरमध्ये राहत होते. त्यांनी आत्महत्या का केली याबद्दल अद्याप काहीच सुगावा लागलेला नाही. याबाबत बारामती शहर पोलिस अधिक तपास करीत आहेत.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version