Site icon Aapli Baramati News

Crime Breaking : ‘आब्या’च्या छेडछाडीने कळस गाठला; ‘ती’ च्या आत्महत्येने इंदापूर तालुका हादरला..!

ह्याचा प्रसार करा

इंदापूर : प्रतिनिधी

गावातील युवकाकडून होत असलेल्या छेडछाडीला कंटाळून नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना इंदापूर तालुक्यातील बोरी येथे घडली. गावातील आब्या नावाचा युवक छेड काढत असून आई-वडिलांच्या प्रतिमेला धक्का लागू नये म्हणून हे पाऊल उचलत असल्याचं या विद्यार्थीनीने चिठ्ठीत लिहिलंय. त्यानुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सिद्धी गजानन भिटे असे आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलीचे नाव आहे. ती बोरी येथील बोरी हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकत होती. ती शाळेत गेल्यानंतर तिला गावातील काही युवकांकडून त्रास दिला जात होता. त्यातूनच तिने काल सायंकाळी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. याबाबत तिचे वडील गजानन भिटे यांनी तक्रार दाखल केली आहे. 

आत्महत्येपूर्वी या मुलीने चिठ्ठी लिहिली असून आई-वडिलांच्या प्रतिमेला धक्का लागू नये म्हणून आत्महत्या करत असून ‘आब्या’ मुळे आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे. गावातील तीन मुले या मुलीची छेडछाड करत होते अशी माहिती पुढे आली आहे. त्यानुसार वालचंदनगर पोलिसांनी तिघा मुलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version