Site icon Aapli Baramati News

CORONA BREAKING : सावधान.. कोरोना पुन्हा आलाय; इंदापुरातील एकाला कोरोनाची लागण, बारामतीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू..!

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच बारामती आणि इंदापूर तालुक्यातील नागरिकांची धाकधूक वाढवणारी बातमी समोर आली आहे. इंदापूर तालुक्यातील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असून त्याच्यावर बारामतीत उपचार सुरू आहेत. गेल्या काही वर्षांपूर्वी कोरोनाने अक्षरश: हैदोस घातला होता. त्यानंतर आता पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळू लागल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.

गेल्या दोन वर्षांपूर्वी बारामतीने कोरोनाचा कहर अनुभवला होता. तालुका स्तरावर मोठ्या संख्येने रुग्ण बारामतीत आढळत होते. मात्र वैद्यकीय सुविधांची उपलब्धता करण्यात आल्यामुळे कोरोना आटोक्यात आणण्यात यश आले होते. अशातच आता नव्याने कोरोनाने डोके वर काढले आहे. केरळ, कर्नाटकसारख्या राज्यात कोरोनाचा नवीन प्रकार आला आहे. महाराष्ट्रातही या नवीन प्रकाराने काही रुग्णांना ग्रासले आहे.

अशातच बारामतीतही एक कोरोना बाधित रुग्ण आढळला आहे. इंदापूर तालुक्यातील हा रुग्ण असून त्याला कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत. बारामतीतील खासगी रुग्णालयात या रुग्णावर उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, देश पातळीवर रुग्णसंख्या वाढत असून आता त्याचे लोण ग्रामीण भागातही येत आहे. त्यामुळे प्रत्येकाने अधिकाधिक खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरोग्य यंत्रणेकडून करण्यात आले आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version