Site icon Aapli Baramati News

BREAKING NEWS : उद्या अजितदादा बारामतीत; सहयोग निवासस्थानी होणार जनता दरबार..!

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या रविवार दि. २६ मे रोजी बारामती दौऱ्यावर आहेत. उद्या सकाळी ९ ते ११ या वेळेत अजितदादांच्या उपस्थितीत सहयोग या निवासस्थानी जनता दरबाराचेही आयोजन करण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे रविवार दि. २६ मे रोजी बारामती दौऱ्यावर येत आहेत. पहाटेपासून ते विकासकामांची पाहणी करणार आहेत. त्यानंतर सकाळी ९ ते ११ या वेळेत सहयोग निवासस्थानी अजितदादांचा जनता दरबार पार पडणार आहे. यामध्ये ते नागरीकांच्या समस्या जाणून घेणार आहेत.

बारामती दौऱ्यावर असताना अजितदादांच्या उपस्थितीत जनता दरबाराचं आयोजन केलं जातं. यामध्ये अजितदादा प्रत्येक नागरीकाला भेटून त्यांच्या समस्या जाणून घेत असतात. तसेच त्या समस्यांबाबत तात्काळ तोडगा काढण्याबाबत सुचना करत असतात. त्यामुळे अजितदादांच्या जनता दरबाराला मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.

अजितदादांची भेट अन काम होणार हा जनतेचा विश्वास..!

उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती दौऱ्यावर असल्यानंतर जनता दरबाराचे आयोजन केले जाते. त्यामध्ये नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या मांडत असतात. अजितदादांकडून या समस्यांबाबत संबंधित प्रशासनाला सुचना देऊन तोडगा काढण्यात येतो. त्यामुळे अजितदादांकडे गेल्यानंतर काम होणारच हा विश्वास जनतेला असतो.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version