बारामती : प्रतिनिधी
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत ‘ब’ वर्गातून नवनाथ उद्योग समुहाचे संचालक संग्राम तानाजीराव सोरटे यांची बिनविरोध निवड झाली आहे. विरोधी गटाकडून या प्रवर्गात एकही अर्ज नव्हता. त्याचबरोबर काही अपक्षांनीही आपली उमेदवारी मागे घेतल्याने संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. त्यामध्ये ‘ब’ वर्गातून संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड झाली आहे. संग्राम सोरटे यांना राष्ट्रवादीपुरस्कृत सोमेश्वर विकास पॅनलमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती.
आज अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी ‘ब’ वर्गातून दाखल झालेले सर्वच अर्ज माघारी घेण्यात आले. त्यामुळे संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड झाली आहे.