Site icon Aapli Baramati News

Breaking News : बारामती सहकारी बॅंक निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा पॅनल जाहिर

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

बारामती सहकारी बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी पुरस्कृत सहकार प्रगती पॅनलच्या उमेदवारांची यादी आज जाहिर करण्यात आली. यात बहुतांश जुनेच चेहरे असून मोजक्याच नवीन इच्छुकांना संधी मिळाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुचनेनुसार ही उमेदवार निवड करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी दिली. 

बारामती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत काल मेळावा पार पडला. त्यामध्ये बोलताना अजित पवार यांनी मंगळवारी सकाळी उमेदवार जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी सहकार प्रगती पॅनेलच्या  उमेदवारांची यादी जाहीर केली. 

आज जाहीर झालेल्या यादीत सर्वसाधारण मतदार प्रवर्गातून सचिन सदाशिव सातव, मंदार श्रीकांत सिकची, रणजित वसंतराव धुमाळ, जयंत विनायकराव किकले, नुपुर आदेश वडूजकर, देवेंद्र रामचंद्र शिर्के, डॉ. सौरभ राजेंद्र मुथा, किशोर शंकर मेहता, ॲड. शिरीष दत्तात्रय कुलकर्णी, नामदेवराव निवृत्ती तुपे यांना संधी देण्यात आली आहे. 

महिला राखीव प्रवर्गामध्ये कल्पना प्रदीप शिंदे, वंदना उमेश पोतेकर, भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्गातून उद्धव सोपानराव गावडे, इतर मागास प्रवर्गातून रोहित वसंतराव घनवट आणि अनुसूचित जाती जमाती प्रवर्गात विजय प्रभाकर गालिंदे यांना उमेदवारी मिळाली आहे.    


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version