बारामती : प्रतिनिधी
बारामती शहर आणि तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा फैलाव वाढत आहे. बारामतीत काल दिवसभरात ८१ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे बारामतीकरांची चिंता वाढली असून प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.
बारामतीतील शासकीय प्रयोगशाळेत काल २०७ नमुने तपासण्यात आले. त्यामध्ये ४० जण पॉझिटिव्ह आले आहेत. तर खासगी प्रयोगशाळेत तपासलेल्या ५२ पैकी ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तसेच एकूण ५६८ जणांची ॲन्टीजन तपासणी करण्यात आली, त्यामध्ये ३० जण पॉझिटिव्ह आले आहेत. काल दिवसभरात ८१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
बुधवारी बारामती शहरातील ५६ आणि ग्रामीण भागातील २५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. तर मंगळवारी ६१ जण कोरोना बाधित आढळले आहेत. त्यामुळे बारामतीतील कोरोना रुग्णसंख्या चांगलीच वाढत असल्याने बारामतीकरांची चिंता वाढली आहे.
बारामतीत मागील महिन्यापर्यंत कोरोना रुग्णांचे प्रमाण नगण्य होते. मात्र आता कोरोनाचा फैलाव वाढला असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. त्यामुळे आता प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.