Site icon Aapli Baramati News

Breaking News : मनोहरमामाला न्यायालयीन कोठडी; ओंकार शिंदेला तीन दिवसांची पोलिस कोठडी

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

कॅन्सरवर उपचार करण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याप्रकरणी अटक केलेल्या मनोहरमामा तथा मनोहर भोसले याला आज न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तर या प्रकरणात फरार असलेल्या ओंकार शिंदे याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

बारामती शहरातील कसबा येथील शशिकांत खरात यांच्या वडीलांना कॅन्सर हा आजार झाला होता. आपण संत बाळूमामाचे अवतार असल्याचे सांगत मनोहर भोसले यांनी कॅन्सर बरा करण्याच्या बहाण्याने  २ लाख ५१ हजार रुपये घेतले. याबद्दल शशिकांत खरात यांनी बारामती तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर मनोहरमामासह ओंकार शिंदे आणि विशाल वाघमारे यांच्यावर फसवणूक आणि जादू टोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. 

बारामती तालुका पोलिसांनी १० सप्टेंबर रोजी मनोहरमामाला अटक केली होती. तब्बल नऊ दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर मनोहरमामाला आज न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, या प्रकरणातील ओंकार शिंदे यालाही अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version