बारामती : प्रतिनिधी
बारामती शहरात आज अन्न व औषध प्रशासनाकडून विविध ठिकाणी धाडसत्र राबवण्यात आले.. त्यामध्ये शहरातील भिगवण रस्त्यावरील हिंद स्वीटस या मिठाईच्या दुकानामध्ये तब्बल ५० किलो भेसळयुक्त खवा आढळून आलाय.. या कारवाईमध्ये अन्न व औषध प्रशासनाने संबंधित खवा पुरवठादारही शोधला असून त्याच्यावरही कारवाई केली जाणार आहे..
दरम्यान, भेसळयुक्त खवा मिळून आल्यानंतर अन्न औषध प्रशासनाकडून हिंद स्वीटस हे मिठाईचे दुकान १५ दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दिपावलीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने आज बारामतीत अनेक ठिकाणी धाडसत्र राबवले. त्यामध्ये बारामती शहरात नव्यानेच सुरु झालेल्या हिंद स्वीटस या दुकानात तब्बल ५० किलो भेसळयुक्त खवा आढळून आला. या खव्याच्या पुरवठादाराचाही अन्न व औषध विभागाने शोध घेतला असून त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे.
हिंद स्वीट्सला परवानाच नाही..!
बारामती शहरात नव्याने सुरु झालेल्या हिंद स्वीटस या दुकानावर अन्न व औषध प्रशासनाने धाड टाकली. त्यामध्ये ५० किलो भेसळयुक्त खवा आढळून आला असून या दुकानाचा परवानाच नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. त्यामुळे हे दुकान १५ दिवस बंद ठेवण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांनी दिले आहेत.