Site icon Aapli Baramati News

Breaking : सोमेश्वर कारखाना निवडणूकीत भाजपचा धुव्वा; चारही गटात ‘राष्ट्रवादी’चाच बोलबाला

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत सोमेश्वर विकास पॅनलने जोरदार मुसंडी मारली आहे. पहिल्या दोन गटांपाठोपाठ तिसऱ्या आणि चौथ्या गटातही राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी प्रचंड मताधिक्य घेत विजय मिळवला आहे.

सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळपासून सुरु आहे. आतापर्यंत चार गटांचे निकाल हाती आले असून त्यामध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत सोमेश्वर विकास पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे.

होळ-मोरगाव या तिसऱ्या गटामध्ये सोमेश्वर विकास पॅनलच्या आनंदकुमार होळकर (१७८८८), किसन तांबे (१८०५९), शिवाजीराजे निंबाळकर (१८०३०) आणि कोऱ्हाळे- सुपा गट क्र. ४ मधून सुनील भगत (१८१४४), हरीभाऊ भोंडवे (१७७५१), रणजित मोरे (१७३४१) यांनी विजय मिळवला आहे.

सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारली आहे. या निवडणुकीत भाजपच्या पॅनलला १० टक्क्यांपेक्षा कमी मते मिळाली आहेत.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version