पुणे : प्रतिनिधी
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने पॅनल जाहीर केला आहे. त्यामध्ये नऊ विद्यमान संचालकांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. तर आठ संचालकांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. याशिवाय दहा नव्या चेहऱ्यांना संचालकपदासाठी नव्याने संधी देण्यात आली आहे.
पुणे जिल्हा बॅंकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एकहाती सत्ता आहे. गेल्या ३० वर्षांपेक्षा अधिक काळ ते जिल्हा बॅंकेचे प्रतिनिधीत्व करत आहेत. त्यामुळे उमेदवार निवडीचे सर्वाधिकार अजित पवार यांच्याकडे होते. त्यानुसार त्यांनी केलेल्या सुचनेनुसार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी उमेदवार यादी जाहीर केली.
या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार संजय जगताप, आमदार संग्राम थोपटे यांच्यासह मावळमधून माऊली दाभाडे आणि वेल्ह्यातून रेवणनाथ दारवटकर असे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. काल जाहीर करण्यात आलेल्या यादीत दहा नवीन उमेदवारांचा समावेश आहे. त्यामध्ये दोन उमेदवारांना काही काळानंतर संधी देण्यात आली आहे.
जिल्हा बॅंक उमेदवार यादी
१) अजित पवार (बिनविरोध)
२) दिलीप वळसे-पाटील (बिनविरोध)
३) संग्राम थोपटे (बिनविरोध) ४) संजय जगताप (बिनविरोध) ५) रेवणनाथ दारवटकर (बिनविरोध)६) ज्ञानोबा दाभाडे (बिनविरोध)७) दिलीप मोहिते पाटील८) अशोक पवार ९) रमेश थोरात१०) संजय काळे११) सुनिल चांदेरे १२) रणजीत निंबाळकर१३) मैत्रीपूर्ण लढत (अ वर्ग-हवेली) १४) दत्तात्रय भरणे
१५) सुरेश घुले१६) दिगंबर दुर्गाडे१७) प्रविण शिंदे१८) संभाजी होळकर१९) दत्तात्रय येळे २०) पूजा बुट्टे पाटील२१) निर्मला जागडे
उमेदवारी नाकारलेले संचालक
१) अर्चना घारे – बँकेच्या विद्यमान उपाध्यक्ष२) निवृत्ती अण्णा गवारे
३) वर्षा शिवले
४) प्रकाश म्हस्के
५) भालचंद्र जगताप
६) तुळशीराम भोईर
७) आत्माराम कलाटे