Site icon Aapli Baramati News

BLOOD DONATION : बारामतीत प्रेषित मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त उद्या रक्तदान शिबिराचं आयोजन

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त उद्या शनिवार दि. ३० सप्टेंबर रोजी सकल मुस्लिम समाजाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात अधिकाधिक नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीचे औचित्य साधून बारामतीत सकल मुस्लिम समाजाकडून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये उद्या शनिवार दि. ३० सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. बारामती शहरातील इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या स्व. माणिकबाई चंदूलाल सराफ रक्तपेढीत सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत हे शिबिर होणार आहे.

बारामती शहर आणि परिसरातील विविध संघटना आणि मित्र मंडळांच्या माध्यमातून हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरातून अधिकाधिक रक्त संकलित करून ते गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला आहे. या शिबिरात अधिकाधिक नागरिकांनी सहभाग घेऊन रक्तदान करावं असं आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version