बारामती : प्रतिनिधी
राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर आज प्रथमच अजितदादा बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. नेहमीप्रमाणे भल्या पहाटेच अजितदादांनी बारामती शहरातील विकासकामांची पाहणी केली. सत्तांतरानंतरही अजितदादांचा विकासाचा झंझावात आणि जनहितांच्या कामाप्रती असलेलं पॅशन या निमित्ताने पुन्हा एकदा पहायला मिळाले.
विरोधी पक्षनेते अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावर आहेत. राज्यात झालेल्या राजकीय घडामोडीनंतर आणि विरोधी पक्षनेतेपदी निवडीनंतर प्रथमच अजितदादा बारामतीत आले आहेत. सकाळी ६ वाजल्यापासून अजितदादांनी बारामतीतील विकासकामांची पाहणी केली.
सत्तांतर झाल्यानंतरही अजितदादांचा विकासकामांचा झंझावात कायम असल्याचे या निमित्ताने पहायला मिळाले. बारामती शहरातील विविध विकासकामांची पाहणी करत त्यांनी पदाधिकाऱ्यांना सुचनाही दिल्या. कामे दर्जेदार व्हावीत याकडे पदाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे असेही निर्देश त्यांनी दिले.
सत्ता असो वा नसो, जनहिताची कामे तितक्याच तळमळीने करण्यावर अजितदादा भर देतात. राज्यातील सत्तासंघर्षानंतर महाविकास आघाडीची सत्ता गेली असली तरी अजितदादांची विकासकामांप्रती तळमळ आणि जनहितांच्या कामांचा उरक कायम असल्याचेच या निमित्ताने बारामतीकरांना अनुभवायला मिळाले.