बारामती : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार हे रविवार दि. २८ जानेवारी रोजी बारामती दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात बदल करण्यात आला असून विकासकामांच्या पाहणीनंतर सकाळी ९ वाजता विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलात जनता दरबार होणार आहे. दरम्यान, पूर्वनियोजित दौऱ्यात बदल करण्यात आल्यामुळे जनता दरबाराची वेळ बदलण्यात आली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उद्या रविवार दि. २८ जानेवारी रोजी बारामती दौरा आयोजित करण्यात आला आहे. सुधारीत दौऱ्यानुसार सकाळी ६ वाजल्यापासून अजितदादा बारामती शहर व परिसरातील विकासकामांची पाहणी करतील. त्यानंतर सकाळी ८-३० वाजता मारवाड पेठ येथील जावेद हबीब हेअर आणि ब्युटी सलूनच्या उदघाटन समारंभाला उपस्थित राहतील. या कार्यक्रमानंतर बारामती एमआयडीसीतील हॉटेल हिरकणीचे उदघाटन अजितदादांच्या हस्ते होणार आहे.
सकाळी ९ वाजता विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये अजितदादा नागरीक व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत, याची कार्यकर्ते व नागरीकांनी नोंद घ्यावी असे आवाहन उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आले आहे. जनता दरबारानंतर अजितदादा पुढील दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत.