Site icon Aapli Baramati News

BIG NEWS : अजितदादांच्या नागरी सत्कारासाठी बारामती सजली; व्यासपीठावरील भव्यदिव्य फलकातून दिला ‘हा’ संदेश..!

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

राज्यातील राजकीय घडामोडीनंतर अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यानंतर ते पहिल्यांदाच बारामतीत येत आहेत. या पार्श्वभूमीवर बारामतीकरांच्या वतीने अजितदादांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात येत आहे. शारदा प्रांगणात होत असलेल्या या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर अजितदादांची भव्यदिव्य प्रतिमा उभारण्यात आली असून त्यातून अजितदादांच्या कामातील वेगळेपण दाखवून दिलं आहे.

शनिवार दि. २६ ऑगस्ट रोजी अजितदादा बारामती दौऱ्यावर येत आहेत. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर अजितदादा प्रथमच बारामतीत येत आहेत. त्यामुळे बारामतीकरांच्या वतीने अजित पवार यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी सध्या केली जात आहे. शारदा प्रांगणात हा कार्यक्रम होत असून भव्य असे व्यासपीठ या ठिकाणी उभारण्यात आले आहे.

विकासपुरुष म्हणून ओळख असलेल्या अजितदादांनी आजवर विकासलाच महत्व दिले आहे. या पार्श्वभूमीवर विकासकामांच्या प्रतिमा वापरुन एक आगळावेगळा फलक तयार करण्यात आला आहे. अजितदादांच्या कामाचं वेगळेपण दाखवणारा हा फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. एकूणच बारामती अजितदादांच्या स्वागतासाठी सजल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

असा असेल अजितदादांचा दौरा

अजितदादा हे दुपारी २ वाजता बारामती तालुक्यातील सुपे येथे दाखल होणार आहेत. त्या ठिकाणी सुपे पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उदघाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी अडीच वाजता मोरगाव येथील मयूरेश्वर मंदिरात दर्शन घेतील. त्यानंतर दुपारी ३.४५ वाजता माळेगाव येथील पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उदघाटन होणार आहे. दुपारी ४.३० वाजता कसबा येथील शिवाजी उद्यानापासून निघणाऱ्या मिरवणुकीत अजितदादा सहभागी होतील. शहरातील मुख्य रस्त्यांवरून ही मिरवणूक शारदा प्रांगणात येणार असून त्या ठिकाणी नागरी सत्काराचा मुख्य कार्यक्रम पार पडणार आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version