बारामती : प्रतिनिधी
विरोधी पक्षनेते अजित पवार हे शुक्रवार दि. २ डिसेंबर रोजी बारामती दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते विकासकामांची पाहणी करणार आहेत. तसेच सकाळी ९ वाजता अजितदादा बारामतीतील विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलात जनता दरबारास उपस्थित राहणार आहेत.
अजितदादा उद्या पहाटेपासून बारामती शहर आणि परिसरातील विकासकामांची पाहणी करणार आहेत. त्यानंतर सकाळी ९ वाजता विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलात जनता दरबार होणार आहे. जनता दरबारात आलेल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यावर तात्काळ संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना अजितदादा देत असतात. त्यामुळे जनता दरबारासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असते.
सत्ता असो वा नसो अजितदादा बारामतीत नागरिकांच्या भेटीसाठी उपलब्ध असतात. येणाऱ्या नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तात्काळ तोडगा काढणं ही अजितदादांची खासीयत आहे. त्यामुळे जनता दरबारात येणारे नागरिक आपले काम होणारच या खात्रीने येत असतात.