Site icon Aapli Baramati News

BIG NEWS : उद्या अजितदादांचा बारामती दौरा; पहाटेपासून विकासकामांच्या पाहणी, तर विद्या प्रतिष्ठानमध्ये जनता दरबाराचे आयोजन

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी  

उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या रविवार दि. २८ जानेवारी रोजी बारामती दौऱ्यावर येत आहेत. पहाटे ६ वाजल्यापासून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. पहाटे विकासकामांची पाहणी झाल्यानंतर अजितदादा सकाळी ११ वाजता विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलामध्ये जनता दरबाराला उपस्थित राहून नागरिकांच्या अडचणी जाणून घेणार आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा रविवारी बारामती दौरा होत आहे. पहाटे ६ वाजता अजितदादा बारामती शहर आणि परिसरातील विविध विकासकामांची पाहणी करणार आहेत. त्यानंतर सकाळी ९-३० वाजता मारवाड पेठेतील जावेद हबीब हेअर अँड ब्युटी सलूनचे उदघाटन अजितदादांच्या हस्ते होणार आहे. तसेच सकाळी १० वाजता बारामती एमआयडीसीतील हॉटेल हिरकणीच्या उदघाटन कार्यक्रमास अजितदादा हजेरी लावतील.

सकाळी ११ वाजता विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये अजितदादा कार्यकर्ते व नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेणार आहेत. जनता दरबारानंतर अजितदादा पुढील दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version