बारामती : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या रविवार दि. २२ ऑक्टोबर रोजी बारामती दौऱ्यावर येत आहेत. सकाळी ६ वाजल्यापासून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. विकासकामांची पाहणी करुन ते सकाळे १० वाजता विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलात जनता दरबारासाठी उपस्थित राहणार आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या बारामतीत येत आहेत. उद्या दिवसभर ते विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. सकाळी ६ वाजल्यापासून ते बारामती शहर आणि परिसरातील विविध विकासकामांची पाहणी करुन आढावा घेणार आहेत. सकाळी १० वाजता विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलात जनता दरबार होणार असून त्यामध्ये अजितदादा नागरीकांच्या समस्या जाणून घेणार आहेत.
दुपारी ३ वाजता स्वामी चिंचोली येथील अनंतराव पवार इंग्लिश मिडीयम स्कूलचे उदघाटन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला अजितदादाही उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता पणदरे येथे अजितदादांचा उपमुख्यमंत्री व पालकमंत्रीपदी निवडीबद्दल आणि केशवराव जगताप यांचा माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नागरी सत्कार होणार आहे.