Site icon Aapli Baramati News

Big Breaking : बारामतीतील ‘त्या’ युवकाची आत्महत्या ब्लॅकमेलिंगमुळे; एका युवतीवर गुन्हा दाखल

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

बारामती शहरातील कसबा येथील आमीर शकूर काझी या युवकाने ब्लॅकमेलिंगला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. एका युवतीशी असलेल्या अनैतिक संबंधातून ती बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत असल्याने या युवकाने आत्महत्या केल्याच्या फिर्यादीवरून हा संबंधित युवतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, आमीर शकूर काझी याचे लग्नानंतरही एका तरुणीशी संबंध होते. त्यातून त्याच्या घरी वाद होवू लागल्यामुळे त्याला या तरुणीशी संबंध संपवण्याची ताकीद कुटुंबीयांनी दिली. तसेच त्याला घरातून वेगळे राहण्यास सांगितले. या दरम्यान, आमीरने या युवतीशी संबंध तोडण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र ही युवती त्याला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत होती.

याबाबत आमीरला त्याच्या पत्नीने विचारणा केल्यानंतर त्याने संबंधित युवती बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत असल्याने आपल्याला तिच्याकडे जाणे टाळता येत नसल्याचे सांगितले. १९ मे रोजी आमीर जोरजोरात फोनवर बोलत घरी आला आणि त्याने दाराची कडी लावून घेत लोखंडी अॅंगलला साडीने गळफास घेत आत्महत्या केली, अशी फिर्याद त्याच्या पत्नीने दिली आहे. त्यानुसार बारामती शहर पोलिसांनी संबंधित युवतीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version