Site icon Aapli Baramati News

Big Breaking : माळेगाव नगरपंचायतीवर उच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी  

माळेगाव ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करण्यावर मुंबई उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. नगरपंचायतीबाबत दाखल करण्यात आलेले आक्षेप फेटाळून लावल्याने माळेगाव नगरपंचायतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

माळेगाव ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर करण्यात आले होते. मात्र याबाबत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत आक्षेप घेण्यात आला होता. त्यामुळे माळेगाव नगरपंचायतीची निवडणूकही लांबणीवर पडली होती. आज मुंबई उच्च न्यायालयाने याबाबतचे आक्षेप फेटाळून लावल्यामुळे माळेगाव नगरपंचायतीवर शिक्कामोर्तब झाले आहे.

दरम्यान, माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी अनेकांनी तयारी केली आहे. मात्र उच्च न्यायालयाचा निकाल येत नसल्यामुळे इच्छुकांच्या पदरी निराशा आली होती. आज उच्च न्यायालयाच्या निकालानंतर संबंधित इच्छुकांना दिलासा मिळाला आहे.

Details Awaited

 

 


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version