Site icon Aapli Baramati News

BIG BREAKING : बारामतीत अजितदादा-सुप्रियाताई एका मंचावर; दिवाळीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला लावली हजेरी..!

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

डेंग्युतून बरे झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीत आयोजित शारदोत्सव कार्यक्रमात हजेरी लावली. खासदार सुप्रिया सुळे, टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्यासह पवार कुटुंबीय या कार्यक्रमाला उपस्थित होते. गायिका बेला शेंडे यांच्या गीतांचा अजितदादा व पवार कुटुंबीयांनी मनमुराद आनंद लुटला.

बारामतीत दरवर्षी पवार कुटुंबीयांच्या वतीने शारदोत्सव या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. यावर्षी बेला शेंडे यांच्या लाईव्ह ईन कॉन्सर्ट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. कालच उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यातील कौटुंबिक कार्यक्रमानंतर दिल्लीला गेले होते. त्यामुळे ते बारामतीतील कार्यक्रमाला येतात का याबद्दल साशंकता होती. मात्र रात्री पुण्यात दाखल झाल्यानंतर आज सायंकाळी बारामतीत त्यांनी शारदोत्सव कार्यक्रमात हजेरी लावली.

अजितदादांसह खासदार सुप्रिया सुळे, टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि संपूर्ण पवार कुटुंबीयांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. या कार्यक्रमादरम्यान अजितदादा आणि सुप्रिया सुळे यांनी एकत्रितपणे गायिका बेला शेंडे व त्यांच्या सहकाऱ्यांचा सन्मान केला. अजितदादांनी पूर्ण कार्यक्रमाचा मनमुरादपणे आनंद घेत टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसादही दिला.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version