Site icon Aapli Baramati News

BIG BREAKING : निरा डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या कामाला अजितदादांनी लावला ब्रेक; पुरुषोत्तम जगताप यांची माहिती

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

बारामती तालुक्यातून वाहणाऱ्या निरा डाव्या कालव्याचे अस्तरीकरण थांबवण्याच्या सुचना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केल्या आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेत अस्तरीकरण थांबवण्यात आल्याची माहिती सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यापर्यंत बारामती तालुक्यातील जनतेच्या भावना पोहोचल्या आहेत. आजपर्यंत पवार कुटुंबीयांनी कधीही जनतेला किंवा शेतकऱ्यांना त्रास होईल, सामान्यांचे नुकसान होईल अशी भुमिका घेतलेली नाही. याच पार्श्वभूमीवर आज ना. पवार यांच्याशी दूरध्वनीवरुन झालेल्या संभाषणात लोकभावनेचा आदर करुन हे काम थांबवण्याच्या सुचना केल्या असल्याचे पुरुषोत्तम जगताप यांनी सांगितले.

सामान्य जनता आणि शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेत अजितदादांनी क्षणाचाही विलंब न लावता अस्तरीकरण थांबवण्याच्या सुचना केल्या आहेत. त्यामुळे आता निरा डाव्या कालव्यावर कोणत्याही प्रकारचे अस्तरीकरण होणार नसल्याचेही जगताप यांनी यावेळी स्पष्ट केले. अजितदादांनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल पुरुषोत्तम जगताप यांनी सोमेश्वरच्या सभासदांच्या वतीने आभार मानले.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version