Site icon Aapli Baramati News

Big Breaking : पेट्रोल डिझेल दर कपातीवर अजितदादा म्हणतात… पुन्हा काही तरी कारण सांगून दर वाढवू नयेत म्हणजे झालं..!

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

वाढत्या इंधन दरामुळे केंद्र सरकारवर रोष वाढत आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून दर कपात करण्यात आली आहे. हे दर तसेच कमी राहावेत, अन्यथा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या असे निमित्त सांगून पुन्हा पेट्रोल आणि डिझेलचे दर त्याच किंमतीवर आणून ठेवतील असे होऊ नये एवढीच अपेक्षा असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीत म्हटलंय. 

आज बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, देशभरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर नाराजी होती. त्यामुळे केंद्र सरकारने हा निर्णय घेतला. मात्र असे असले तरी देखील हे दर अशीच कायम कमी राहावेत, अन्यथा पुन्हा त्याच स्थितीवर हे दर आले, तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. 

तेलाच्या किमती वाढवण्याचे अधिकार केंद्र सरकारला आहेत. त्यानुसार केंद्र सरकार या तेलाच्या किमती वाढवते किंवा कमी करते. कोणतेही सरकार असले तरी गोरगरीब जनतेला संसार चालवायला परवडले पाहिजे अशी परिस्थिती सरकारने निर्माण केली पाहिजे, असेही अजित पवार यांनी नमूद केले. 

राज्य सरकारने यापूर्वीच हे दर कमी केले आहेत राज्य सरकारने त्यांचा कर कमी करताना सर्वसामान्य माणूस टॅक्सी चालक वाहन चालक या सर्वांचा विचार केला आणि एक हजार कोटींचा बोजा सहन करत यापूर्वीच सीएनजीचा दर कमी केले मात्र हे दर पुन्हा वाढले असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version