बारामती : प्रतिनिधी
बारामती शहर आणि तालुक्यात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. काल दिवसभरात तब्बल २२४ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मागील काही दिवसात कोरोनाने कहर केला असून एकाच दिवसात २२४ रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे.
बारामती शहरासह ग्रामीण भागात कोरोनाने डोके वर काढले आहे. मागील काही दिवसांत कोरोना बाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. काल दिवसभरात कोरोना रुग्णसंख्येने उच्चांक गाठला असून २२४ जण कोरोना बाधित आढळून आले आहेत.
काल २८६ जणांची शासकीय प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ९१ जण पॉझिटिव्ह आढळले. तर खासगी प्रयोगशाळेत ८४ जणांच्या तपासणीत ३५ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला. काल दिवसभरात ५८५ जणांची एंटीजन तपासणी करण्यात आली. त्यातील ९८ जण कोरोना बाधित आढळून आले आहेत.
काल दिवसभरात बारामती शहरातील १६५ आणि ग्रामीण भागातील ५९ जण अशा एकूण २२४ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मागील काही दिवसात कोरोना रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.