Site icon Aapli Baramati News

BARAMATI : वाघळवाडीच्या मयूरीची पोलिस उपनिरीक्षकपदाला गवसणी; पाच वर्षांची मेहनत आली फळाला..!

ह्याचा प्रसार करा

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथील मयूरी महादेव सावंत हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवले आहे. तिची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. मयूरी ही गेल्या पाच वर्षांपासून या परीक्षेची तयारी करत होती. तिच्या यशानंतर वाघळवाडी परिसरात तिचे कौतुक होत आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मयूरीने राज्यात मुलींमध्ये बारावा क्रमांक मिळवला आहे. वाघळवाडी येथील उत्कर्ष आश्रमशाळेत पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलेल्या मयूरीने माळेगाव येथील शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयात अभियांत्रिकी पदवी मिळवली. सन २०१९ पासून ती स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती. पोलिस दलात काम करण्याच्या उद्देशाने ती प्रयत्नशील होती.

आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये मयूरीने घवघवीत यश मिळवत मुलींमध्ये राज्यात बारावा क्रमांक मिळवला आहे. दरम्यान, मयूरीचे वडील महादेव सावंत हे  उत्कर्ष आश्रमशाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. तर आई गृहिणी आहे. आईवडिलांसह सर्व शिक्षक आणि मार्गदर्शकांनी दाखवलेली दिशा आणि घेतलेली मेहनत यामुळे हे यश मिळाल्याचे मयूरीने सांगितले.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version