सुपे : सचिन पवार
बारामती तालुक्यातील सुपे येथे दहिहंडी उत्सव अतिशय उत्साहात व जल्लोषमय वातावरणात साजरा करण्यात आला. सुपेसह परिसरातील गावातील आबालवृद्धांनी मोठ्या उत्साहात सहभागी होत दहीहंडीचा आनंद लुटला.
सुपे परगाण्यातील मानाची पहिली दहिहंडी बस स्थानक परिसरात अंत्यंत उत्साहमय वातावरणात पार पडली. यावर्षी प्रथमच सुपे गावातील तरूणाई, ग्रामस्थांनी व बाळगोपाळांनी दहिहंडीचा मनसोक्त आनंद लुटला. सुपे येथील प्रमुखांनी आयोजित केलेली ही मानाची हंडी पाच थर लावत १२-१२ ग्रूप, आमराई बारामती संघाच्या गोविंदांनी फोडली. तसेच उंडवडी येथील जय मल्हार संघने सहभाग घेतला होता. पहिल्या क्रमांकाला ७७७७ रूपये, द्वितीय क्रमांकाला ३१११ रुपये बक्षीस देण्यात आले.
शिवशंभो सांऊडच्या उडत्या चालीच्या गाण्यांवर ठेका धरत महालक्ष्मी लेझर लाईटचा रंगीबेरंगी प्रकाशात ‘गोविंदां रे गोपळा’ तसेच ‘बोल बजरंग बळी की जय’च्या जयघोषात सर्वच गोविंदांनी ठेका धरला. पहिली मानाची हंडी फोडल्यानंतर दुसर्या दिवशी गावामध्ये बांधण्यात आलेली दहीहंडीही फोडण्यात आली.